Monday, June 23, 2014

कविता करायचा प्रयत्न -१) मने जिंका आयुश्याच युद्ध नाही

भांड्याला भांड लागतं आवाज होतो
मनाला मन भेटली तर काय वेगळं होत

सारख्याच कश्या होतील फक्त मनमिळावू गप्पा
कधी कधी वाद - भांडण तर कधी रुसवा फुगवा

देवानी पण किती छान घडवलंय आपल्याला
कान नाही पण तोंड बंद ठेवता येत सगळ्यांना

कानातून ऐकावे पण काय साठवायचे आणि काय नाही
ते आपलं आपणच ठरवावे, कारण बोलतय ते तोंड आपलं कुठे

तोंडाने बोलावे पण काय बोलायचं आणि काय नाही
त्यावर आपणच पूर्ण नियंत्रण ठेवावे, आपणच मालक ना ह्याचे

आयुष्य हे काही युद्ध नव्हे जे जिंकायचे आपल्याला
झालंच तर जिंकावी मने पण न दुखावता कोणाला